Thu, Jan 17, 2019 17:13होमपेज › Pune › सात वर्षानंतर झाला माय-लेकाच्या खुनाचा उलघडा

सात वर्षानंतर झाला माय-लेकाच्या खुनाचा उलघडा

Published On: Feb 08 2018 5:51PM | Last Updated: Feb 08 2018 5:51PMपुणे : प्रतिनिधी

कुविख्यात गुन्हेगाराकडून साडू आणि त्याच्या आईचा खून करून मृत्यदेह लोणावळाच्या दुधारी घाटात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार ६ वर्षांपूर्वी घडला होता. या घटनेचा उलगडा 6 वर्षानंतर गुन्हे शाखेने समोर केला आहे. 
सुनील अण्णा कांबळे (30), सनी उर्फ रामचंद्र जाधव आणि गणेश उर्फ पपू डामसे यांना अटक करण्यात आली आहे. यात संभाजी उर्फ पिंट्या आनंदा गोठे आणि आणि त्याची आई कांताबाई गोठे यांचा खून झाला आहे. 

सुनील कांबळे सराईत गुन्हेगार आहे. मयत संभाजी गोठे हा आरोपी सुनील कांबळे याचा साडू आहे. दरम्यान आरोपी सुनील याला त्याची मेहुनी म्हणजेच मयत संभाजी गोठेची पत्नी सोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने प्रथम संभाजी याला मंचर ते भीमाशंकर मधील पोखरी घाटात नेऊन मारले. तसेच त्याचा मृतदेह घाटात टाकला. त्यानंतर चार दिवसांनी संभाजी याच्या आईचा खून करून तो लोणावळा येथील दुधावरी खिंड घाट येथे टाकल्याचे तपासात समोर आले आहे.