Thu, Nov 15, 2018 09:32होमपेज › Pune › पिंपरी : नगरसेवकाच्या खून प्रकरणातील आरोपी अटकेत

पिंपरी : नगरसेवकाच्या खून प्रकरणातील आरोपी अटकेत

Published On: Jul 28 2018 5:15PM | Last Updated: Jul 28 2018 5:15PMपिंपरी : प्रतिनिधी 

पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा 'मास्टर माईंड' सराईत गुन्हेगार शाहरुख अकबर शेख (रा.अप्पर इंदिरानगर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. दरोडा प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२७) बाणेर येथे ही कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस नाईक शैलेश सुर्वे यांना माहिती मिळाली की, खून प्रकरणातील सराईत गुन्हेगार शेख हा बाणेर येथील बियर शॉपीजवळ येणार आहे. त्यानुसार त्यांनी बाणेर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे २ गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे सापडली आहेत. 

शेखवर दरोडा, चोरी, मारहाण, अपहरण अशी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ही कामगिरी दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण, लक्ष्मण ढेंगळे, कर्मचारी संजय दळवी, अजय थोरात, राहुल घाडगे, सचिन अहिवाळे, विल्सन डिसोजा यांच्या पथकाने केली.