Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Pune › पुणेः टेम्पोच्या धडकेत दोघे जागीच ठार, 2 गंभीर

पुणेः टेम्पोच्या धडकेत दोघे जागीच ठार, 2 गंभीर

Published On: May 30 2018 11:15AM | Last Updated: May 30 2018 11:15AMपिंपरी : प्रतिनिधी 

मालवाहतूक ट्रकच्या टायरचे पंक्चर काढत असताना मागून भरधाव आलेल्या पिक अप टेम्पोने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर घडला.

अभिजित महादेव आवळे आणि संतोष दत्तात्रय देवकाते (रा . अर्जुनसोंड, सोलापूर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास बाळासाहेब ढेरे व निसार ( पूर्ण नाव समजू शकेल नाही ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पवना चौकीच्या पुढे एका मालवाहतूक ट्रक ( क्र. एम एच 13 ए क्स 3336 ) जात असताना त्याच्या मागील बाजूचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे वाहन बाजूला घेऊन चालकासह ट्रकमधील अन्य तीन जण टायर बदली करीत होते. यावेळी मागून भरधाव येणा-या पिक अपने (एम एच 13 सी जी 0110) या चौघांना धडक दिली. अपघातानंतर पिकअप चालकाने तेथून पळ काढला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.