Wed, Jul 24, 2019 02:14होमपेज › Pune › डंपरच्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा ठार

डंपरच्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा ठार

Published On: Jan 14 2018 10:14PM | Last Updated: Jan 14 2018 10:14PM

बुकमार्क करा
रांजणगाव गणपतीःवार्ताहर

शिरूर येथे पुणे-नगर रस्त्यावर कासारी फाटा येथे दुचाकीस डंपरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात  पती-पत्नीसह त्यांचा अकरा वर्षीय मुलगा ठार झाला. पोपट विठ्ठल गोरडे(वय, ३७),  शैला पोपट गोरडे (वय, ३३) आणि मुलगा पांडुरंग पोपट गोरडे (वय ११, रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. गोरडे कुटुंबीय करसंक्राती निमित्ताने आळंदीहून देवदर्शन घेऊन शिरूरकडे येत असताना  सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट गोरडे हे नोकरीच्या निमित्ताने ढोकसांगवी (ता. शिरूर) येथे राहतात. रविवारी  मकरसंक्रातची सुट्टी  असल्यामुळे पोपट व त्यांचे मित्र अमोल बुधवंत व त्यांचा एक मित्र असे तिघे स्वतंत्र दुचाकीवरून कुटुंबासह आळंदी येथे देवदर्शनासाठी गेले होते. आळंदी येथून देवदर्शनाहून परत शिरूरकडे येत असताना शिक्रापूर जवळील पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथे गोरडे यांच्या (एम एच १२ एम झेड १६५४ ) या दुचाकीला शिरूरच्या दिशेने येऊन कासारी फाट्याच्या विरुद्ध दिशेने असलेल्या (एम एच १२ ई एफ ९१९०) डंपरची जोरदार धडक बसली. यात दुचाकीचालक पोपट गोरडे व पाठीमागे बसलेली पोपटची पत्नी शैला हिच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने या पती पत्नींचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा पांडुरंग हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलिस हवालदार दत्तात्रय होले, योगेश नागरगोजे, अमित देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्‍यांनी डंपर व दुचाकी बाजूला घेत येथील जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर डंपर व डंपरचालक यास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अमोल श्रीराम बुधवंत (वय २८ वर्षे रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे ,मूळ राहणार शेवडी ता. जिंतूर जि. परभणी) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी डंपर चालक निलेश शंकर जाधव (वय २८ वर्षे रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, डंपरचालकाला अटक केली आहे.