Mon, Feb 18, 2019 20:06होमपेज › Pune › अत्याचारित पीडित मुलगी ‘ससून’मधून गायब

अत्याचारित पीडित मुलगी ‘ससून’मधून गायब

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सोळा वर्षीय मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणल्यानंतर ती रुग्णालयातून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या प्रकरणी पल्लवी राजाराम वाघोले (वय 23, रा. चिंचवडगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात बंडगार्डन पोलिस ठाण्यात फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा पोलिस ठाण्यात 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यातील पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आवश्यक होती. त्यामुळे या पीडित मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 19 येथे या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी 14 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सहा मार्च रोजी दुपारपासून ही मुलगी रुग्णालयातून गायब झाली. या प्रकरणी उपनिरीक्षक सुनील पाटील हे अधिक तपास करीत आहेत.