Tue, Jan 22, 2019 20:01होमपेज › Pune › पुणे : बाळ पळवले;महिला सीसीटीव्हीत कैद (video)

पुणे : बाळ पळवले; महिला सीसीटीव्हीत कैद video

Published On: Feb 07 2018 4:14PM | Last Updated: Feb 07 2018 6:13PMपुणे प्रतिनिधी 

कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या दाम्पत्याला गोड बोलून एका महिलेने आठ महिन्याचे बाळ पळवून नेल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी उघडकिस आली. याप्रकरणी बाळाच्या आईने पुणे रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व तिचा पती दोघे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. दोघेही त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह पुण्यात कामाच्या शोधात आले होते.त्यांना काही काम न मिळल्याने ते परत त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने त्यांना ‘तुम्ही जेवून या मी मुल सांभाळते’ असे म्हणून मुल जवळ ठेवून घेतले. हे दाम्पत्य दर्ग्याजवळ जेवण्यासाठी गेले.

जेवून परत आल्यानंतर महिला मुलीसह तेथून पसार झाली होती. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहेत.