Wed, Nov 21, 2018 07:13होमपेज › Pune › प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाचा पुढाकार

प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाचा पुढाकार

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच प्रदुषणाच्या पातळीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरणाला घातक अशा प्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन इंजिनिअर राहुल गुरव या तरुण संशोधकाने ‘पोल्युशन क्लिनर’ या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणामुळे प्रदुषणकारी घटक शोषले जाऊन शुद्ध  हवा बाहेर सोडली जाणार आहे. सौरउर्जेवर चालणार्‍या या उपकरणामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखता येऊ शकते,  असा दावा राहुल यांनी केला आहे.

प्रदूषणात वाढ होत असून,  यावर उपाय करण्याच्या हेतूने त्यांनी प्रयत्न सुरू केले. विविध देशांमध्ये प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात यावर अभ्यास करून या उपकरणाचा शोध लावला आहे. दरम्यान संबंधित उपकरणासाठी त्यांना पेटंट मिळाले असून हे उपकरण प्रत्यक्षात आणण्यासाठी  प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल यांनी सांगितले. 

हे उपकरण दुभाजकावर बसविल्यास वाहनांमुळे  होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणारे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड याद्वारे शोषले जाणार आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल व यातून शुद्ध हवा बाहेर सोडली जाईल.