Fri, Jan 18, 2019 21:14होमपेज › Pune › बर्ड व्हॅली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

बर्ड व्हॅली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:28AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड-संभाजीनगर येथील बर्डव्हॅली उद्यानातील तलावात शनिवारी सायंकाळी एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. तरुणाचा मृतदेह फुगून वर आल्याने पाण्यात तरंगत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. दरम्यान, तरुणाचा खून करुन मृतदेह तलावात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील तलावात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती दिली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवान अशोक कानडे, अमोल खंदारे, प्रतीक कांबळे, भूषण येवले, विनेश वाटकरे, अक्षय पाटील यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. भोसरी, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पाहणी केली. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी महापालिकेच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणण्यात आला आहे; दरम्यान दोन दिवसांपूर्वी तरुणाचा खून करुन मृतदेह पाण्यात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.