Sat, Jul 20, 2019 02:39होमपेज › Pune › फेसबुकवर पोस्ट लिहून त्याने केली आत्महत्या

फेसबुकवर पोस्ट लिहून त्याने केली आत्महत्या

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 9:35AM

बुकमार्क करा

येरवडा ः वार्ताहर 

प्रेयसीचे दुसर्‍या मुलाशी लग्न ठरल्याच्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या करत असल्याची मित्रांना फेसबुकवर पोस्ट टाकून गळफास घेऊन आपले जीवन संपविले. हा प्रकार धानोरी येथे घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली.

रवी रमेशकुमार सोळंकी (32, रा. गुडविल सोसायटी, गोकूळनगर, धानोरी) असे तरुणाचे नाव आहे. रवी याच्या आईचे निधन झाले असून तो वडिलांसोबत गोकूळनगर येथे राहत होता. त्याचा सामाजिक कार्यात सहभाग असायचा. याचदरम्यान एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र त्या मुलीचे दुसर्‍या मुलासोबत लग्न जमलेे. हा विरह सहन न झाल्यामुळे रवी निराश झाला होता.

त्याने दि. 1 डिसेंबर रोजी घरी कोणी नसताना आपल्या जवळच्या मित्रांना आत्महत्या करत असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली. पोस्ट टाकत असताना प्रेयसीचे फोटोदेखील त्याने शेअर केले अन् लगेच गळफास घेऊन आत्महत्या केली. सपोनि रविकिरण दरवडे तपास करीत आहेत.