Tue, Jul 16, 2019 13:54होमपेज › Pune › चिंचवडगावात तरुणाची आत्महत्या

चिंचवडगावात तरुणाची आत्महत्या

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 11:11PMपिंपरी : प्रतिनिधी

चिंचवडगाव येथे एका तरुणाने आत्महत्या केली. मात्र नर्मदेच्या पाण्याने मला अखेरची अंघोळ घाला आणि मंडलेश्वर येथील तिरावर माझ्यावर अंत्यसंस्कार करा, अशी शेवटी इच्छा चिठ्ठीतून व्यक्त केली.  ही घटना सोमवारी सकाळी घडली. जतीन धनंजय जहागीरदार (34, रा. राम मंदिराजवळ चिंचवडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जतीन याने टेरेसवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. इमारतीच्या बाहेर लटकलेला मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी अग्निशामक दलास पाचारण केले.

जतीन याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. तसेच नर्मदेच्या पाण्याने अखेरची आंघोळ घालावी. याच नदीच्या तीरावर असलेल्या मंडलेश्वर येथे अंत्यसंस्कार करावे, अशी अखेरची इच्छा त्याने लिहिली आहे. आपल्या आई वडिलांचा प्रेमविवाह झाला आहे. भाऊ वहिनी पुतण्या आणि आई वडील यांनी एकमेकांची काळजी घ्यावी. तसेच माझ्या दुचाकीमध्ये माझा जीव असल्याने ती विकू नका. अशी विनंतीही जतीन यांनी चिठ्ठीत केली आहे.