Tue, Apr 23, 2019 21:47होमपेज › Pune › पत्नीच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या

पत्नीच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या

Published On: Jan 28 2018 1:38AM | Last Updated: Jan 27 2018 11:35PMपिंपरी : प्रतिनिधी 

पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हाजीमलंग कासीमसाहब मुल्ला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सपना हाजीमलंग मुल्ला (29), रंजना प्रकाश शिर्के (50), अतिश प्रकाश शिर्के (32), सुजाता अतिश शिर्के (28), प्रकाश शिर्के (55, सर्व रा. साई संकुल सोसायटी, धनगरबाबा मंदिरासमोर, रहाटणी), संदीप वाघमारे, विकास म्हस्के (35) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ नबीलाल मुल्ला (41, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  

2014 मध्ये सपना व हाजीमलंग यांचा विवाह झाला; मात्र त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याने सपना माहेरी गेली; मात्र सपना व तिच्या माहेरकडील नातेवाईक, वकील आणि मित्राच्या मदतीने हाजीमलंग यांना वारंवार त्रास देऊन कर्ज काढण्यास सांगत होते. त्यासाठी हाजीमलंग यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या त्रासाला कंटाळून आदर्शनगर येथे हाजीमलंग यांनी राहत्या घरात शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.