Sat, Apr 20, 2019 10:26होमपेज › Pune › मराठा आरक्षणासाठी युवक चढला उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर (व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी युवक चढला उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर (व्हिडिओ)

Published On: Aug 15 2018 8:43AM | Last Updated: Aug 15 2018 12:03PMबारामती : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीत स्वातंत्र्यदिनी सकाळीच एक युवक भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोरील उच्च दाब वीज वाहिनीच्या टॉवरवर चढला आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळीच ही घटना समोर आल्याने प्रशासन पुरते घामाघूम झाले आहे.

हातात भगवा झेंडा घेत तो मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. आंदोलन संपविण्यासाठी आणि तरुणाला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीही या युवकाला विनंती केली. मराठा समाजासाठी विविध आंदोलन काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, समाजाबद्दल कोणीही काहीही वक्तव्य करण्याचे थांबवा अशा मागण्यांसह अमोल भापकर मळद या तरुणाने टॉवर वरून खाली उतरत आंदोलन संपविले.