Fri, Apr 26, 2019 20:07होमपेज › Pune › अबब! तरुणाने घेतली बनावट कागदपत्रांवर 159 सिमकार्ड

अबब! तरुणाने घेतली बनावट कागदपत्रांवर 159 सिमकार्ड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी महाविद्यालयीन तरुणाने बनावट टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स फर्मची कागदपत्रे तयार करून त्याद्वारे आयडिया कंपनीचे तब्बल 159 पोस्टपेडचे सिम  कार्ड घेतल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने हे सिमकार्ड तिसर्‍याच व्यक्तीला दिली आहेत. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मोहसीन सलीम पठाण (वय19, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि हर्षल राजेंद्र मुथा (वय 30, रा. वर्धमाननगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणी नीलेश तापकीर (वय 33, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चंदननगर भागात एंजल कम्युनिकेशन हे दुकान असून, त्यांच्याकडे आयडिया कंपनीचे सिमकार्ड विक्री करतात. दरम्यान, मोहसीन हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर, हर्षल मुथा याचे यापूर्वी मोबाईलचे दुकान होते. मोहसीन याने एस. के. टूर्स अ‍ॅड ट्रॅव्हल्स फर्मच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केले.

या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांच्या दुकानातून 10 जानेवारीपासून एकूण आयडिया कंपनीचे 159 पोस्टपेडचे सिमकार्ड घेतले. सिमकार्ड विक्रेत्यांना एका सिम कार्डमागे कमिशन पोटी 700 रुपये मिळतात. मात्र, हे सिमकार्ड वापरकर्त्याने एक महिना वापरून त्याचे आलेले बिल कंपनीला भरल्यानंतर कंपनीकडून कमिशनचे पैसे दिले जाते. दरम्यान, फिर्यादी हे 700 मधील 300 रुपये मोहसीन याला कमिशन पोटी देत होते. त्यानुसार, एकूण 47 हजार 500 रुपये फिर्यादी यांना कंपनीने कमिशन देण्यापूर्वीच घेतले. मात्र, त्यानंतर अनेक सिमकार्ड हे कंपनीचे एक महिन्याचे बिल भरले गेले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच, पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान, मोहसीन पठाण हा हर्षल मुथा याला हे सिमकार्ड देत होता. मुथा हे सिमकार्ड इतरांना विक्री करीत होता. त्यांनी सिमकार्ड नेमके कोणाला दिले आहेत, याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Tags : Youth, Mobile, Sim Card, Fake Papers,  In Pune, Document


  •