Fri, Jul 10, 2020 23:10होमपेज › Pune › पुण्यात भर रस्त्यात तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल 

पुण्यात भर रस्त्यात तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल 

Published On: Dec 14 2017 5:04PM | Last Updated: Dec 14 2017 4:52PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुण्यात भर रस्त्यावर एका तरुणीला तीन तरुणांनी जबर मारहाण केल्याचा प्रकारसमोर आला आहे. हा प्रकार चंदननगर परिसरातील झाला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलीआहे. तरूणांनी गुरूवारी (१३ डिसेंबर) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. 

चंदनगर परिसरातील अहमदनगर रोड पाचवा मैल उप्पाला हॉटेल शेजारी हा प्रकार घडत असताना  एका नागरिकाने मोबाइलच्या कॅमेर्‍याने ही घटना कैद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. ते तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पीडित तरुणी कोण?, तिघे तरुण तिला का मारहाण करत होते?, याबाबत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  चंदननगर पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.