Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Pune › स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरुणीची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरुणीची आत्महत्या

Published On: Mar 03 2018 8:46AM | Last Updated: Mar 03 2018 8:46AMपुणे : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या तणावातून तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चिंचवड येथे वाल्हेकरवाडी परिसरात उघडकीस आली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पर्धा परीक्षेच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

प्रीती गोरख जाधव (22, रा. वाल्हेकरवाडी, मूळ बीड सांगवी, जि. बीड) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. ती वाल्हेकरवाडी येथे हॉस्टेलमध्ये राहण्यास होती. तिच्या खोलीत आणखी चार मुली होत्या. त्या कामावर निघून गेल्या. त्यातील एक मुलगी घरी आली तेव्हा तिने दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने दाराच्या जाळीतून आत पाहिले तेव्हा प्रीतीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.