Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Pune › राहत्या घरीच तरूणीवर बलात्कार करून खून 

राहत्या घरीच तरूणीवर बलात्कार करून खून 

Published On: Dec 07 2018 9:38PM | Last Updated: Dec 07 2018 9:39PM
पुणे : प्रतिनिधी

राहत्या घरात एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीवर बलात्कारकरून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिंहगड परिसरात आज, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना समोर आली.  वैष्णवी विजय भोसले (वय १७, रा. धायरी) असे तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञातावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटूंबीय सिंहगड भागातील धायरेश्‍वर वस्ती येथे निळकंठ हाईट्‌स इमारतीत तिसर्‍या मजल्यावर राहण्यास आहेत. वैष्णवी ही एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. दरम्यान, नेहमीप्रमाणे आई-वडिल काल, गुरुवारी सकाळी कामासाठी गेले होते. तर, भाऊ शाळेत गेला होता. वैष्णवी एकटीच घरी होती. यानंतर तिचा भाऊ सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आला. यावेळी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. यामुळे भावाने तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ झाल्यानंतरही ती उठत नव्हती. यामुळे त्याने आई-वडिलांना फोनकरून याबाबत माहिती दिली. 

आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी वैष्णवीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर वैष्णवीला मृत घोषीत केले. दरम्यान, तिचा हातावर, पायावर गळ्यावर जखमा झाल्या होत्या. सिंहगड रोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेतली. शवविच्छेदन करण्यात आले असता यात वैष्णवीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राहत्या घरात मुलीवर बलात्कार करून खून झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.