Mon, Apr 22, 2019 11:40



होमपेज › Pune › कोण आहेत अ‍ॅड. गडलिंग आणि सुधीर ढवळे?

कोण आहेत अ‍ॅड. गडलिंग आणि सुधीर ढवळे?

Published On: Jun 06 2018 10:05AM | Last Updated: Jun 06 2018 10:07AM



पुणे : पुढारी ऑनलाईन

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे वकील सुरेंद्र गडलिंग यांच्यासह नक्षलवाद्यांचा म्होरक्या रोना विल्सन यांचा समावेश आहे.

वाचा : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषद आयोजकांना अटक

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारापूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्याजवळ एल्गार परिषद घेतली होती. एल्गार परिषदेच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल भडकल्याचा आरोप तिघांवर आहे.  

सुधीर ढवळे –(रिपब्लिकन पँथरचे संस्थापक )

-सुधीर ढवळे हे रिपब्लिकन पँथरचे संस्थापक सदस्य  
-विद्रोही चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि दलित लेखक अशीही त्यांची ओळख
- शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब (प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज) अॅक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष अभियानांतर्गत योगदान 
- सुधीर ढवळे नक्षलवाद्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप
- एल्गार परिषदेत कोरेगाव दंगलीपूर्वी भडकाऊ भाषणे आणि पुस्तके वाटप केल्याचा आरोप आहे 

अॅड. सुरेंद्र गडलिंग? (नागपुरातून अटक)
-नक्षलवादाचे आरोप असलेल्यांचे खटले लढणारे वकील अशी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची ओळख 
-अ‍ॅड. गडलिंग जवळपास गेल्या २० वर्षांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित खटले लढवतात
-दिल्ली विद्यापीठाचा प्रा. साईबाबासह अनेक नक्षलवादी समर्थकांचे खटले त्यांनी लढले