Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Pune › शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर

शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर

Published On: Jan 16 2018 9:21AM | Last Updated: Jan 16 2018 9:21AM

बुकमार्क करा
पिंपरी प्रतिनिधी

शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी  योगेश बाबर यांची नियुक्ती निश्चित असल्याचे पुढारी ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.  शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकात बाबर यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे

गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते.  पालिका निवडणुकीनंतर त्यांच्याकडे सेनेचे गटनेतेपद आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती. शहरप्रमुख पदासाठी खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी योगेश बाबर यांच्या नावाची तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबर यांच्या नावाला पसंती दिली आहे

योगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली लक्षणीय मतेही घेतली होती 

बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.