Fri, Apr 26, 2019 03:30होमपेज › Pune › ‘येरवड्या’त कैद्यांची सहकार्‍याला मारहाण

‘येरवड्या’त कैद्यांची सहकार्‍याला मारहाण

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून एका कैद्याला सात कैद्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील रुग्णालय विभागातील बॅरेक क्रमांक एकमध्ये घडली. 

याप्रकरणी दत्ता बाळू माने, चेतन चंद्रकांत पवार, निलेश विजय गायकवाड, सौरभ विलास कंधारे, रोहन राजू गाडे, अनिकेत अनिल कांबळे, अनिकेत गोकूळ केदळे या सात जणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पोलिस शिपाई हरिश्‍चंद्र राऊत यांनी फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता माने हा येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तो गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बराकमधील बाथरुममध्ये जात असताना त्याची बबन उर्फ अरबाज इकबाल शेख या कैद्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर या वादातून गुन्हा दाखल केलेल्या इतर सहा जणांनी दत्ता माने याच्यासह मिळून बबन उर्फ अरबाज शेखला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले.  याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. पी. लोहार करीत आहेत.