Sat, Sep 22, 2018 16:38होमपेज › Pune › ‘वायसीएम’च्या चार डॉक्टरांचे राजीनामे

‘वायसीएम’च्या चार डॉक्टरांचे राजीनामे

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:57AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील चार डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. विनाकारण फैलावर घेतल्याचा आरोप करीत या डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. अद्याप हे राजीनामे मंजूर करण्यात आले नसल्याचे रुग्णालयीन प्रशासनाकडून करण्यात आले.  

‘वायसीएम’ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे बुधवारी (दि. 6) डॉ. अपूर्वा, डॉ. राहुल, डॉ. अभिजित आणि डॉ. गाडेकर यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे सर्व डॉक्टर तज्ज्ञ असून यांना पालिकेने एका वर्षासाठी घेतले असून हे ‘डिलिव्हरी’ विभागात कार्यरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी ‘वायसीएम’ मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रुग्णावर उपचार करताना त्रुटी राहिले असल्याचे सांगत उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी या सर्व डॉक्टरांना कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना फैलावर घेतले. ही आमची जबाबदारी नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. तरीदेखील जाधव यांनी या डॉक्टरांना खडेबोल सुनावले. त्यामुळे या चारही डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत.