Sat, Jun 06, 2020 07:50होमपेज › Pune › 38 गावांच्या पोलिसपाटील पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

38 गावांच्या पोलिसपाटील पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:08AMलोणी काळभोर : प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील 38 गावांच्या पोलिस पाटील पदाच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा रविवारी (ता. 13) होईल, अशी माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.हडपसर येथील साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय हे दोन केंद्र निश्‍चित केले असून सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत ही लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी प्रवर्गानुसार एकूण 93 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 11 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून उर्वरित 82 उमेदवारांची परीक्षा होणार आहे. 

सर्व पात्र उमेदवारांनी उपविभागीय कार्यालयातून परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन जावे, तसेच परीक्षेला येताना अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाण्याच्या मूळ व छायांकित प्रती बरोबर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिस पाटीलपदासाठीचे आरक्षण व गावांची यादी

अनुसूचित जाती (मांजरी बुद्रुक), अनुसूचित जाती महिला (हिंगणगाव, सोरतापवाडी, भिलारेवाडी), अनुसूचित जमाती (सांबारेवाडी, सांगावी सांडस, खामगाव टेक, किन्हई, काळेवाडी), अनुसूचित जमाती महिला (नायगाव, थोपटेवाडी), विशेष मागास प्रवर्ग महिला (डोणजे), विशेष मागास प्रवर्ग (मणेरवाडी), विमुक्त जाती (अ) महिला (तळेरानवाडी), विमुक्त जाती (अ) (आंबी, फुरसुंगी), भटक्या जमाती (ब) महिला (गोगलवाडी, अवसरेनगर, तरडे), भटक्या जमाती (ब) (शिंदेवाडी, तानाजीनगर), भटक्या जमाती (क) (मांडवी खुर्द), इतर मागास वर्ग (महिला) (मोगरवाडी, साष्टे, शेवाळवाडी), इतर मागास वर्ग (होळकरवाडी, सणसनगर), इतर मागास वर्ग (खुला) (निरगुडी, खडकवाडी), खुला प्रवर्ग (महिला) (औताडे हांडेवाडी, मांगडेवाडी, अहिरे, साडेसतरानळी), खुला प्रवर्ग (जांभळी, जांभूळवाडी, गुजर निंबाळकरवाडी, कुडजे, वडाची वाडी).