Tue, Jul 23, 2019 06:23होमपेज › Pune › डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक  ः शरद पवार

डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक  ः शरद पवार

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 12:11AMऔंध : वार्ताहर 

राज्यात व देशात डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज असून यात राज्यकर्ते व पोलीस यांच्यासह समाजातील सर्वांची जबाबदारी महत्वाची आहे. याबाबत आपण सर्वांनी विचार करण्याची गरज असून याविरोधात आमच्यासारख्यांनी  विचार करुन कठोर कायदे करण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

बाणेर बालेवाडी मेडीकोज असोसियशनच्या वतीने बाणेर येथे डॉक्टर दिनानिमित्त आयोजित वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार वितरण व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उउद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, असोसियशनचे अध्यक्ष डॉ. जे. एस. महाजन, संस्थापक डॉ. राजेश देशपांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या डॉ. नीरज आडकर, डॉ.शिरीष हिरेमठ, असोसियशनसाठी महत्वपूर्ण कार्य करणारे डॉ. राजेश देशपांडे यांच्यासह गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी  पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.