Thu, Apr 25, 2019 14:14होमपेज › Pune › कामगाराचा मृत्यू, मालकावर गुन्हा

कामगाराचा मृत्यू, मालकावर गुन्हा

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:42PM

बुकमार्क करा

पिंपरी : चिखली कुदळवाडी येथे मशिनवर काम करणार्‍या कामगाराचा विजेचा झटका बसल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शंकरलाल भागाराम जाट (48, रा. शाहुनगर, चिंचवड) या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार राजे यांनी फिर्याद दिलेली आहे. तर कमलेश कुमार बसंतलाल चौहान (25, रा. चिंचवड) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी चिखली येथे जाट याच्या मालकीची एस.एम. प्लॅस्टिक कंपनी आहे. 

या कंपनीत कमलेश हा काम करत होता. कमलेश याला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता त्याला मशिनवर काम करण्यास लावले होते. 17 डिसेंबर रोजी मनिशच्या विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला. कामगाराच्या सुरक्षेच्यादृष्टिने कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.