Mon, May 27, 2019 06:46होमपेज › Pune › महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग; कर्मचार्‍याला अटक

महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग; कर्मचार्‍याला अटक

Published On: Jan 11 2018 1:10AM | Last Updated: Jan 11 2018 12:01AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

एसआरपीएफमधील  महिला अधिकार्‍याचा मुंबईतील पोलिस कर्मचार्‍याने विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी कर्मचार्‍याला अटक केली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नीलेश आदेश भालेराव (वय 28, रा. कल्याण वसाहत, सांताक्रुझ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी 49 वर्षीय महिला पोलिस अधिकार्‍यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश भालेराव हा मुंबई फोर्स वन येथे पोलिस शिपाई पदावर नोकरीस आहे. दरम्यान, एसआरपीएमध्ये फिर्यादी महिला अधिकारी आहेत. दरम्यान, नीलेश भालेराव येथे पोलिस दलातील अंतर्गत कार्यशाळेसाठी आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. दरम्यान, तो फिर्यादी यांना काही अडचण असल्यास विचारत असे. त्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख झाली होती. त्यानंतर ते अधून-मधून फोनवरही बोलत असत. तो त्याच्या खासगी अडचणीही महिला अधिकार्‍यांना सांगत असे. त्यातच नीलेश भालेराव याचे लग्न ठरले.

मात्र, काही कारणास्तव नीलेश याचे लग्न मोडले. त्यामुळे तो फिर्यादी यांच्याकडे लग्न जुळवून देण्याची तसेच मदत करण्याची मागणी करत होता. मात्र, फिर्यादी यांनी त्याला तुझी वैयक्तिक बाब असून, मी मदत करू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तो मंगळवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास एसआरपीएफ येथे आला. तुम्ही मदत केली नाही, मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत हाताला धरून विनयभंग केला. या प्रकरणी अधिक तपास वानवडी पोलिस करीत आहेत.   

यापूर्वीही केली होती शिवीगाळ 

नीलेश व फिर्यादी महिला अधिकारी यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख होती.  महिला अधिकारी कामानिमित्त अलंकार परिसरात आल्या होत्या. त्यावेळी नीलेश याने महिला अधिकार्‍यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात त्याच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.