Wed, Sep 26, 2018 18:25होमपेज › Pune › ‘आयटी’च्या तरुणीही ‘ऐटी’त!

‘आयटी’च्या तरुणीही ‘ऐटी’त!

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:34AMपुणे: प्रतिनिधी

यंदाच्या वारीत ग्रामीण भागातील महिलांबरोबरच शहरातील कॉर्पोरेट तरुणींचा सहभागही लक्षणीय होता. चकचकित ऑफिसमध्ये काम करणार्‍या आय.टी. क्षेत्रातील काही तरुणींनीही विठ्ठलनामाचा गजर करीत वारकर्‍यांची सेवाही केली. 

कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांनी वारकर्‍याबरोबर दिंडीत सहभाग घेतला. यावेळी तरुणींनी टाळ-मृदंग वाजवत व विठ्ठलाचा जप करत पायी  वारीचा मनसोक्त आनंद घेतला.इंजिनिअर, मॅनेजर अशा विविध  क्षेत्रात काम करणार्‍या तरुणी वारीत सहभागी झालेल्या. काही तरुणी तर मुंबई, कानपूर, ओडिशा येथून खास वारीत सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. वारीतला हा त्यांचा उत्साह आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.

वारीत सह्भागी झालेली सॉफ्टवेअर इंजिनिअर विदुला इंगळे म्हणाली, वारीबद्दल अनेकदा ऐकले होते; मात्र यंदा  पालखी शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी  पुण्यात मुक्कामी आहेत, त्यामुळे वारीत सहभागी होता आले. वारीत डोक्यावर तुळस घेऊन इतर वारकरी महिलांबरोबर चालताना  खूप आनंद आला. माझ्या मैत्रिणी गेली 3 वर्षे वारीमध्ये येतात. मीही दरवर्षी सहभागी होणार आहे.  खूप वेगळा आणि छान अनुभव मला वारीने दिला असे तिने यावेळी सांगितले.