Tue, Jul 23, 2019 07:25होमपेज › Pune › एजंटकडून महिलेवर बलात्कार

एजंटकडून महिलेवर बलात्कार

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:37AMपुणे : वार्ताहर 

महिलेकडून घर व दुकानासाठी 28 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर अधिक पैशांची मागणी करत कर्ज मंजूर करून देण्याचे अमिष दाखवून बोलवत  तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच घर व दुकान घेऊन न देता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. चाळीस वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून इस्टेट एजंट सरफराज हाफिज इनामदार याच्यावर गुन्हा दाखल केला.  

 इनामदार हा इस्टेट एजंट आहे. त्याची आणि महिलेची ओळख आहे. दरम्यान महिलेचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. तिला घर व तिच्या लाँड्रीसाठी दुकान घ्यावयाचे होते. त्यासाठी तिने इनामदार याच्याशी मार्च 2016 मध्ये संपर्क साधला. त्यानंतर तिच्याकडून घर व दुकान खरेदी करण्यासाठी 28 लाख 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही तिच्याकडे त्याने अधिक पैशांची मागणी केली. त्यासाठी त्याने तिला एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून देण्याचे अमिष दाखवून विमाननगर येथील प्लीझंट अ‍ॅवेन्यू सोसायटी येथे बोलवून घेतले. त्यानंतर तेथे तिच्याशी अश्‍लील संभाषण करून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पतीला जिवे मारण्याची धमकीही दिली.

हा प्रकार मार्च 2016 ते जून 2017 दरम्यान घडला. त्यानंतर महिलेला त्याने घर किंवा दुकान घेऊन न देता फसवणूक केली. महिलेने याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे या करीत आहेत.