Wed, Nov 21, 2018 03:44



होमपेज › Pune › विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:28AM



पिंपरी  : प्रतिनिधी

अश्‍लील फोटो नातेवाइकांना दाखवण्याची; तसेच सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत एका 25 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो ‘झीरो नंबर’ने हिंजवडी पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघे जण फरार आहेत. जितेंद्र तुरिया आणि अजेश तिवारी या दोघांना अटक केली आहे, तर अजेश तिवारी हा कंपनीतील सुपरवायझर असून, पीडित महिलेचा गैरफायदा घेत त्याने आणि त्याच्या इतर सहकार्‍यांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत  म्हटले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. 

पीडित महिला ही बावधन परिसरात राहते. ती हिंजवडी येथील एका कंपनीत ‘हाऊसकीपिंग’चे काम करते. काही दिवसांपूर्वी या महिलेला पैशांची आवश्यकता असल्याने तिने अजेश तिवारी याच्याकडे पैसे मागितले. त्याने पैसे देण्याच्या आमिषाने तिला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला; तसेच त्याने तिचे नग्नावस्थेतील फोटो काढले. हे फोटो दाखवून तिला धमकाविले; तसेच त्याच्या इतर साथीदारांनीही तिच्यावर  बलात्कार केला. कात्रज, बावधन आणि मारुंजी येथील जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.