पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरासह राज्यात अनक ठिकाणी धुके पडायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे गार्डनवर पहाटे दाट धुक्याची चादर पांघरली होती. धुक्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. थंडीतही पुन्हा वाढ झाली आहे.
धुक्याने झाडे पाने फुलांवर दवबिंदु निर्माण झाले होते. गार्डनमध्ये फिरायला जाणार्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद घेतला. मात्र, धुक्यामुळे समोरचे दिसत नसल्याने वाहन चालकांना मात्र शिस्तीत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या पडत असलेल्या धुक्याचे प्रमाण अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.