Sun, Aug 25, 2019 08:51होमपेज › Pune › पहाटे पाचपर्यंत झिंगाट 

पहाटे पाचपर्यंत झिंगाट 

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 12:45AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन-दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत; तर परमिट रूम आणि क्लब सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारू दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

पुण्यासह मुंबई, नाशिक, ठाणे आणि मुंबई उपनगरामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मद्याचा वापर करते. एरवी वाईन-बीअर शॉप रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू असतात. परंतु या तीन दिवसांत त्यांना रात्री एक वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह राज्यातील बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दारू पिण्यासाठी एक महिन्याचा, एक वर्षाचा आणि आजीवन परवाना देण्यात येतो, पण या सर्वांसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात तळीरामांसाठी वाइन शॉप आणि बारमध्ये एक दिवसाच्या परवान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.