Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Pune › पुण्यात मधापासून वाईनची निर्मिती

पुण्यात मधापासून वाईनची निर्मिती

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:57AMपुणे : समीर सय्यद

वाईनच्या शौकिनांसाठी आतापर्यंत द्राक्ष, चिकू, जांभूळ या फळांपासून तयार केलेली वाईन उपलब्ध होती. मात्र, दोन यांत्रिकी अभियंता तरुणांनी एकत्र येऊन मधापासून वाईनची निर्मिती केली आहे. सध्या पुण्यात 50 आणि मुंबईत 30 किरकोळ व्यापार्‍यांकडे ही वाईन उपलब्ध आहे. 

राज्य शासनाने जुन2017 मध्ये मध आणि गुलाब पाकळ्यांपासून वाईन निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्नाचे स्रोत मिळवून देण्यासाठी धान्यापासून मद्यनिर्मितीचे प्रकल्पही राज्यात उभारण्यात आले. त्यातून काही प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ होत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मधापासून वाईननिर्मितीला प्रोत्साहन देण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. 

राज्यशासनाने परवानगी दिल्यानंतर नितीन विश्‍वास आणि रोहन रिहानी या दोन अंभियंता तरुणांनी मधापासून वाईन निर्मिती करण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले. दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर या तरुणांना यश आले. फेब्रुवारी 2018 पासून प्रत्यक्षात निर्मिती सुरु झाली आहे.