Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Pune › वानवडी परिसरात पोलिस ठाणे होणार का?

वानवडी परिसरात पोलिस ठाणे होणार का?

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:48AMवानवडी : सुरेश मोरे

वानवडी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीमध्ये जवळपास 20 ते 25 चौरस किलोमीटर व्यासाचा परिसर येतो. या परिसराच्या सुरक्षिततेसाठी चार पोलिस चौक्या आहेत. वानवडी बाजार, भैरोबानाला, घोरपडी बाजार आणि महंमदवाडी येथील चौक्यांचा समावेश आहे, तर मुख्य पोलिस ठाणे हे हडपसर इंडस्ट्रीयल परिसरात आहे. 

या ठिकाणी पब्लिक ट्रान्सफोरची कोणतीही सुविधा नाही. जायच असेल तर स्पेशल वाहन अथवा रिक्षा करून जाणे. किरकोळ कारणासाठी नागरिक पोलिस चौकीमध्ये जातात. मात्र एखाद्या मोठ्या तक्रारी संबधात असो किंवा अन्य कारणासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांशी चर्चा करायची असल्यास हडपसर इंडस्ट्रीयल परिसरातील वानवडी पोलिस ठाणे गाठावे लागते. काही लोकांना ते सापडत देखिल नाही. ते शोधताना सर्वसामान्य लोकांच्या खिशाला नाहक भुर्दंड सोसावा लागतो. किमान 7 ते 8 किलो मीटरचा प्रवास करून पोलिस ठाण्यात जावे लागते. कोंढवा परिसराची देखिल हीच आवस्था होती त्यांना देखिल हडपसर इंडस्ट्रीयल परिसरातच जावे लागत होते. मात्र स्थानिक नागरिक व लोकनेत्यांनी समन्वय साधून कोंढव्यात पोलिस ठाणे उभे केले. मात्र वानवडी परिसरात पोलिस ठाणे होण्यास का अडथळे येतात हा नागरिकांसमोर प्रश्‍न आहे. वानवडी परिसरामध्ये पोलिस ठाणे नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला किवा एखादा गंभीर गुन्हा घडला तर, पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना व त्यांच्या स्टापला घटनास्थळी पोहचण्यास विलंब होतो. परिसरात पोलिस ठाणे नसेल तर हद्दीतील पोलिस चौक्यांवर व हद्दीवर नियंत्रण ठेवणे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना कठीण होवून जाते.