Mon, Aug 19, 2019 10:10होमपेज › Pune › चारित्र्यावरून पत्नीचा निर्घृण खून

चारित्र्यावरून पत्नीचा निर्घृण खून

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

चारित्र्याचा संशय व दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून सहा वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत हातोड्याने मारहाण करत रस्सीने गळा आवळून पत्नीचा निर्घृणपणे खून केल्याची घटना हडपसर येथे बुधवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

रेणूका संजय पवार (32)असे मयत महिलेचे नाव आहे. संजय अर्जून पवार (40, वेताळ बाबा वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय मंजूळे (29, वारजे ) यांनी फिर्याद दिली आहे.  

संजय पवार हा मजुरीचे काम करत असून तो पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलासोबत राहतो.  पत्नी रेणूका हिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयला होता.  याच कारणावरून बुधवारी संजयने  पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने मारले. ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली. त्यानंतर त्याने रस्सीने गळा आवळून तिचा खून केला. मुलासमोर हा प्रकार घडला.  तर संजयला अटक केली.   तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. झंझाड करत आहेत.