Sun, May 26, 2019 21:02होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’त वायफाय सेवा व डिजिटल फलक  

‘स्मार्ट सिटी’त वायफाय सेवा व डिजिटल फलक  

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 1:04AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत वायफाय इंटरनेट सुविधा, रस्त्यांवरील पददिवे खांबांचे सुशोभिकरण, त्यावर डिजिटल फलक आणि फायबल केबल डक्टींग या दोन कामांसाठी खासगी कंपन्यांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेने 30 जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. हा उपक्रमातून महापालिका खासगी तत्वावर राबवून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करणार आहे. 

संपूर्ण शहर इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी शहरात फायबर केबलचे जाळे उभे करणे. त्यासाठी रस्त्याकडेने डक्टींग पॉलिसी राबविणे आणि त्याची देखभाल व दुरूस्ती करणे या कामांसाठी प्रस्ताव मागविला आहे. तर, रस्त्यावरील पथदिव्याचे अद्ययावत खांब उभारून ते सुशोभित करणे. शहरात ठिकठिकाणी वायवाय झोन करणे. विविध मार्गावर आणि चौकात दिशादर्शक डिजिटल फलक (व्हीएमडी) लावणे. या कामासाठीही प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 

हे काम खासगी कंपनीकडून करून घेण्यात येणार आहे. या माध्यमातून महापालिकेस उत्पन्नही मिळणार आहे. या दोन्ही कामांसाठी वेगवेगळे किंवा एकाच कंपन्यांकडून प्रस्ताव अपेक्षित आहे. त्यासाठी बीएसएनएल, जिओ, विप्रो, फोर्ट, ऑडरी, इंडस, एटीसी, फिनोलेक्स केबल, विक्रम टेलिमॅटीक्स अशा विविध एकूण 15 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या इच्छुक आहेत. त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच झाली आहे. या दोन्ही कामाचे निविदा 20 जानेवारीपर्यंत मागविल्या होत्या. त्यास 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

दुसर्‍या दिवशी 31 तारखेस निविदा प्रस्ताव उघडले जाणार आहेत. त्यावर तांत्रिक सादरीकरण 2 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. योग्य प्रस्तावाचा स्वीकार करून महापालिका त्या कंपनीस काम देणार आहे, असे नियोजन आहे.