Sat, Mar 23, 2019 16:49होमपेज › Pune › पुण्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका का होत नाहीत?

पुण्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका का होत नाहीत?

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण सर्वदूर परीचित आहे. राज्यातील इतर विभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पंचवार्षिक निवडणुका या पार पडतात. मग पुणेच काम मागे राहते. पुण्यात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका का होत नाहीत, असा प्रश्‍न सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला.

सहकार विभाग, महाराष्ट्र शासन व आमदार मेधा कुलकर्णी व सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन सहकारमंत्र्यांकडून करण्यात आले. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, राज्य सहकारी निवडणूक प्रधिकारणाचे आयुक्त मधुकर चौधरी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघाचे चेअरमन सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात नव्याने समाविष्ठ केलेल्या प्रकरणातील तरतुदी बाबत मोहम्मद अरिफ, तसेच सोसायट्यांचे अभिहस्तांतरण, संतोष हिंगाणे, सहकारी संस्थांची निवडणूक या विषयावर मधुकर चौधरी, लेखापरीक्षण या विषयावर नितीन देव तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ या विषयावर मिलिंद आकरे यांनी मार्गदर्शन केले.

देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रधिकरणाकडून पुण्यातील 16 हजार 307 गृहनिमाण सोसायट्यांबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तरी अद्यापही याबाबत सकारात्मक दिसून येत नाही. पुण्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुका देखील वेळेवर होणे आवश्यक आहे. राम आणि रावण हे आज नसले तरी रावणाची वृत्ती आजही कायम आहे आणि ती नंतरही राहणार असेच दिसते आहे. आ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, कोथरूड भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत विधीमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली होती. सोसायट्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत कायमस्वरूपी फोरम तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकारी ज्येष्ठांना सहकार्य करत नाहीत...

सहकार गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नाबाबत मार्गदर्शन झाल्यानंतर नागरिकांनी सहकारमंत्र्यांना सहकार खात्यामधील अधिकारी हे ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करीत नसल्याची तक्र्रार केली. तसेच विनाकारण त्रास दिला जात असल्याचेही नमूद केले. सोसायटयांच्या पुनर्विकासाबाबत यावेळी कोथरूड करांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पाच तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या कार्यशाळेत सोसायट्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.