होमपेज › Pune › आता कोण रोखणार हुकूमशहांचे वादळ?

आता कोण रोखणार हुकूमशहांचे वादळ?

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्ती करून, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. महामंडळाचा हा नवा प्रयोग म्हणून स्वागतार्ह आहे; परंतु, समर्थनीय नाही. हजारो सभासद असलेल्या या संस्थेची लोकशाही पद्धत जपणारी निवडणूक प्रक्रिया रद्द करून, केवळ 15 सदस्यांच्या हुकूमशाहीच्या निर्णयापर्यंत आली आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. वाद होणार नाहीत म्हणून हा निर्णय घेतला असला, तरी आताही वाद होणार नाहीत हे कशावरून? निवडणुकीला पर्याय हुकूमशाहीचा नसतो. साहित्यामध्ये उठू शकणारे हुकूमशहांचे वादळ कोण रोखणार, हा प्रश्‍न आहे. महामंडळाने संमेलनाध्यक्ष पदासाठी वयाची, ज्येष्ठता आणि कर्तृत्वाची श्रेष्ठता, असे कोणतेही निकष ठरविलेले नाहीत. त्यामुळे उद्या कोणीही गटबाजी करणारा आणि हितसंबंध जोपासणारा संमेलनाध्यक्ष होऊ शकतो, हे मराठी संस्कृतीला घातक आहे, असेही काही साहित्यिकांना वाटते.