Sun, Jul 21, 2019 10:15होमपेज › Pune › लाखो रुपयांचा रस्ता नेमका कोणासाठी?

लाखो रुपयांचा रस्ता नेमका कोणासाठी?

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 12:58AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने  महात्मा फुलेनगर ते भोसरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागचा रस्ता तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत; परंतु हा रस्ता राहदरीसाठी की अनधिकृत वाहनतळासाठी असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या वाहनतळाकडे वाहतूक पोलीस यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रभाग क्रमांक 20 मधील एका खासगी मोठ्या कंपनीसमोर त्यांचे कर्मचारी, अधिकारी रस्त्यालगत वाहने उभी करत आहेत. रस्त्याच्या कडेला पिवळ्या रेषेच्या आत वाहने उभी केली असता त्याचा रहदारीला अडथळा निर्माण होत नाही; मात्र गेल्या तीन-चार महिन्यापासून संबंधित कर्मचारी आणि अधिकारी पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहने लावू दोन्हीं बाजूला उभी करू लागल्यामुळे स्थानिक आणि याठिकाणी असणार्‍या इतर कंपन्याना वाहने आत-बाहेर करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

इतर ठिकाणी नियमांचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस या रस्त्याकडे का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न स्थानिक राहिवश्यनी केला आहे. संबंधित खासगी कंपनीत त्यांचे स्वतःचे वाहनतळ असताना वाहने बाहेर रस्त्यालगत का उभी करत आहेत याबाबत वाहतूक पोलीस यांनी माहिती घेऊन कारवाई करावी अशी मागणी महात्मा फुलेनगर वासीयांनी केली आहे.