Sun, Aug 25, 2019 04:32होमपेज › Pune › अन्न सुरक्षा योजनेचे ९९ लाख लाभार्थी कोण?

अन्न सुरक्षा योजनेचे ९९ लाख लाभार्थी कोण?

Published On: May 29 2018 1:35AM | Last Updated: May 29 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नवीन 99 लाख शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य मिळणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली. परंतु त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील किती शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अन्न सुरक्षा योजने नवीन लाभार्थी कोण असणार आहेत याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

अन्न सुरक्षा योजनेचा नवीन 99 लाख शिधापत्रिकांना लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये 44 हजारांपेक्षा पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 56 लाख 63 हजार 282 आणि 59 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 36 लाख 73 हजार 32 आणि अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेल्या शिधापत्रिकाधारक असणार आहेत. परंतु कोणत्या शहरातील, गावातील किती आणि लाभार्थी कोण असणार आहेत. याची कसलीच माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर नवीन लाभार्थी शोधण्याचे काम सुरु करण्यात आले असून, आतापर्यंत केवळ 450 लाभार्थींचा शोध लागला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 11 क्षेत्रिय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातून 6 लाख 71 हजार 39 शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेतून तर अंतोदयच्या 9 हजार 616 कुटुंबांना 889 धान्य दुकांनातून धान्यवाटप केले जाते. तर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षचे एकूण 5 लाख 31 हजार 91 शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाते. परंतु बापट यांनी केलेल्या घोषणेमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील नवीन लाभार्थी किती असणार आहेत. या नवीन 99 लाख लाभार्थीचा शोध घेऊन त्यांना प्रत्यक्षात लाभ कधीपर्यंत मिळेल, याची कोणतीच माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही