Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Pune › वनातील आग आटोक्यात आणताना वनरक्षक गंभीर 

वनातील आग आटोक्यात आणताना वनरक्षक गंभीर 

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:04AM

बुकमार्क करा
बाजारवाडी : वार्ताहर 

आपटी (ता. भोर) येथील राखीव वनक्षेत्रात भरदिवसा लागलेला वणवा विझवत असताना वनरक्षक एस. टी. नागठाणे (46) भाजून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी भीमसेन पांडुरंग जाधव यांनी दिली.

गुरुवारी सकाळी 11च्या  सुमारास  येथे प्रचंड वणवा लागला होता. तो विझवण्यासाठी वनमजूर, वनरक्षक, तसेच वनक्षेत्रपाल के. एम. येळे असे एकूण 15 ते 20 कर्मचारी गेले होते. त्यावेळी आगीचा डोंब अंगावर आल्याने नागठाणे 70 टक्के  भाजले. दरम्यान त्यांच्या सहकार्‍यांनी अंगावरचे कपडे काढून त्याची झोळी करून त्यांना दीड किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात दाखल केले.  अनंत हुकिरे, शिवकुमार होनरावही यात किरकोळ जखमी झाले.

दरम्यान वनवा विझविण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना संरक्षणासाठी बुट, जर्कीन व अन्य कोणतेही साहित्य वनविभागाने पुरविले नव्हत्याची बाब या निमित्ताने पुढे आली आहे.