Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Pune › व्हॉट्स अॅप मेसेजमुळे छळ; नव विवाहितेची आत्महत्या

व्हॉट्स अॅप मेसेजमुळे छळ;विवाहितेची आत्महत्या

Published On: Apr 27 2018 11:11AM | Last Updated: Apr 27 2018 11:11AMयवत: वार्ताहर

व्हॉट्स अॅपवरून मेसेज पाठवल्याच्या किरकोळ कारणावरून एका नव विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दौड तालुक्यातील खामगाव येथे घडली आहे. या प्रकरणी पती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रियांका दातार हिने बुधवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियांका आणि रवींद्र यांचा पाच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. मागील 20 ते 25 दिवसांपूर्वी प्रियांकाने व्हॉट्स अॅपवरून एका नातेवाईकाला मेसेज पाठवला होता. या मेसेजवरून प्रियांका आणि रवींद्र यांच्यात भांडण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या त्रासाला कंटाळून प्रियकांकाने राहत्या घरी आत्महत्या केली. 
  
प्रियांकाचे नातेवाईक विष्णू विशाबर टिगरे (रा.उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी याप्रकरणी रवींद्र दातार, सासरे कुमार दातार आणि सासू छाया दातार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अतुल लकडे करत आहेत. 

Tags : Whatsapp Message, Woman Suicide, Pune