Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › दहावीनंतर काय?....

दहावीनंतर काय?....

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये 10 वी नंतर कोणती शाखा निवडावी,  म्हणून असलेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्यातील शिक्षण विभागाने 10 वीला बसलेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यास 2016 पासून सुरुवात केली. दहावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एकूण कला, वाणिज्य, ललित कला, कृषी, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक व गणवेशधारी सेवा आदी सात शाखा उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेल्या 7 शाखांपैकी कोणत्या शाखेत आवड आहे, हे पाहण्यासाठी ही कलचाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी त्यानुसार आपला कल सांगितला होता. दरम्यान, या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा घेतलेला आढावा... 

वाणिज्य शाखा... 

वाणिज्य शाखा ही व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित आहे. या शाखेतून विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सीए, सीएस, आयसीडब्लुए, एमबीए करता येते. त्याचबूरोबर टॅक्सेशन, बँकिग, अकाऊंटिग, पर्चेस, सेल्स, मार्केंटिग इनशुरन्स, लॉजिस्टिक्स, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स, रिटेल मॅनेजमेन्ट, ऑडिट आदी क्षेत्रात करिअर करता येणार आहे. 

उपलब्ध  संधी.. 
ै प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एमएसबीव्हीइ आणि इतर ) - कालावधी -  6 महिने ते 1 वर्ष 
ै एचएसव्हीइ (उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम ) कालावधी - 2 वर्षे 
ै एचएससी वणिज्य (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ), कालावधी - 2 वर्षे 
ै 10 वीनंतर काही आयटीआय आणि पदविका अभ्यासक्रम वाणिज्य शाखेमध्ये उपलब्ध

कला मानव्यविद्या शाखा
कला हे प्रचंड विस्तारलेले क्षेत्र आहे. यामध्ये केवळ भाषांचाच अभ्यास नसून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य आणि परकिय भाषांचाही समावेश होतो. 

कला क्षेत्रात दहावीनंतर उपलब्ध शैक्षणिक संधी.. 
ै एमएसबीव्हीई चे प्रमाणपत्र व इतर अभ्यासक्रम - कालावधी - 6 महिने ते 1 वर्षे
ै आयटीआय अभ्यासक्रम - कालावधी - 1 ते 3 वर्षे 
ै एचएससी कला (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र )- कालावधी - 2 वर्षे 

गणवेशधारी सेवा.. 
गणेवशधारी सेवा हे एक गौरवशाली करिअर आहे. त्यात अफाट शौर्य, देशभक्ती, धैर्य आणि त्याग वृत्ती यांची आवश्यकता असते. सशस्त्र सेना दलातील सीमा संरक्षणाबरोबरच इतर विविध सुरक्षा सेवांचा यात समावेश होतो. गणवेशधारी सेवा प्रामुख्याने 4 भागात विभागाल्या जाऊ शकतात. शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर गणवेशधारी सेवांमध्ये प्रवेश मिळू शकतो. 
ै संरक्षण दल-भूदल, नौदल, वायुदल
ै निमलष्करी दल
ै केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस दल 
ै नागरी संरक्षण दल

ललित कला शाखा... 
ललित कला ही उपजतच असून मानवाच्या उत्पतीपासूनच अस्तित्वात आहे. दृश्यात्मककला, सादरीकरण, उपयोजित अशा विविध प्रकारनी ललित कलेचे क्षेत्र विस्तारले आहे. दृश्यात्मककलेत चित्रकला, रंगकाम, शिल्पकला, डिझाईन, छायाचित्रण, फिल्म मेकिंग चा समावेश होतो. तर सादरीकरणात्मककलेत नृत्य, संगीत, नाट्य चा समावेश होतो. उपयोजित कलांमध्ये स्वयंपाकशास्त्र, सौंदर्य शास्त्र, फॅशऩ डिझाईन, आर्किटेक्‍चर, इंटिरिअरडिझाईन, जाहिरात, ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, मल्टीमिडीया आदींचा समावेश होतो. 

दहावीनंतर उपलब्ध शैक्षणिक संधी.. 
एमएसबीव्हीई चे प्रमाणपत्र व इतर अभ्यासक्रम - कालावधी - 6 महिने ते 1 वर्षे
एचएसव्हीइ (उच्च माध्यमिक व्यावसायिक शिक्षण ) - कालावधी - दोन वर्ष 
आयटीआय अभ्यासक्रम - कालावधी - 1 ते 3 वर्षे 
तंत्रनिकेतन (10 वी नंतरचे पदविका अभ्यासक्रम )- कालावधी - 3 ते 4 वर्षे 
फौंडेशन पदविका अभ्यासक्रम - कालावधी 1 वर्ष - त्यानंतर 4 वर्षाचा शासकिय पदविका अभ्यासक्रम.