होमपेज › Pune › पाश्‍चिमात्य संगीताचे भारतीयांत वाढतेय फॅड

पाश्‍चिमात्य संगीताचे भारतीयांत वाढतेय फॅड

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 1:11AMपुणे :  केतन पळसकर

1982 मध्ये प्रथम पॅरिसमध्ये संगीत दिवस साजरा झाल्यानंतर आज संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पश्‍चिमी देशातून आलेल्या या रिती-रिवाजाला भारताने स्वीकारत देशात देखील मोठ्या उत्साहात 21 जून रोजी हा दिवस साजरा होत आहे. देशाने स्वीकारलेल्या या रिवाजाप्रमाणेच देशात पाश्‍चिमात्य संगीताचे फॅडसुद्धा वाढत असल्याचे चित्र आहे. 

भारतीय सण, उत्सव यासह विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आज पाश्‍चिमात्य संगीताशिवाय साजरा होत नाही.  या गायकांच्या सॉरी (जस्टिन बिबर), शेप ऑफ यु (ई. डी. शीरन), डेस्पासीटो (जस्टिन बिबर) यासारख्या अनेक गाण्यांनी तरुणांना भुरळ पाडली आहे.  संगीतात क्रांती घडवून आणणारा पॉपचा राजा मायकल जॅक्सन, जस्टिन बिबर, डेव्हिड गुएट्टा यासारख्या भारतात झालेल्या त्यांच्या कॉन्सर्टला भारतीय तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यातून पाश्‍चिमात्य संगीताबद्दल भारतीय तरुणांचे वाढत असलेले फॅड अधोरेखित झाले.

भारतीय संगीत  मन:शांती देणारे

युवकांमध्ये वाद्य, नृत्य आणि गायन याबद्दल प्रचंड आकर्षण आहे.  निसर्गाशी संबंध असलेले भारतीय संगीत अनेक कलाकारांनी वर्षानुवर्षे विचार करून बनविले आहे. भारतीय संगीत मन:शांती देणारे आहे. - पंडित उल्हास कशाळकर, पद्मश्री, शास्त्रीय गायक

संगीताचे धडे देणार्‍या संस्था कमी 

शास्त्रीय गायनासह भारतीय गायन शैलीत धडे देणारे अभ्यासक्रम आणि धडे देणार्‍या शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. परिणामत: आजच्या पिढीचा ओढा पाश्‍चिमात्य संगीताकडे वाढत चालला आहे.   -सुरमई पातुरकर, संगीत अभ्यासक