Thu, Apr 25, 2019 15:31होमपेज › Pune › जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे पिंपरीत स्वागत

जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे पिंपरीत स्वागत

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 11:33PMपिंपरी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून नुकतेच पिंपरीत आगमन झाले. या परतीच्या पालखीचे विठू भक्तांनी पिंपरीत उत्साहात स्वागत केले. या वेळी वारकर्‍यांना अल्पोपहार, फळवाटप करण्यात आले. 

पिंपरी येथे दुपारी सव्वाचार वाजता पिंपरीत पंढरपूरहून पालखीचे आगमन झाले. या वेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे व दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. स्वागत सोहळ्याला रमेश वाघेरे, अरुण साठे, प्रवीण मुथ्था, आनंद आगरवाल, रामभाऊ पाडाळे, नामदेव नाणेकर, ख्वाजाभाई कुरेशी, सुरेश घोरपडे, महादेव गुंजाळ आदी उपस्थित होते. पाऊणतास पालखीने पिंपरीत विसावा घेतला. या वेळी रमेश वाघेरे आणि मित्रपरिवाराच्या वतीने बुंदी, बिस्किट, चहा; तसेच फळवाटप करण्यात आले. पाऊणतासाच्या विसाव्यानंतर पालखीने पिंपरीगावाकडे प्रस्थान केले. पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर येथे पालखी मुक्‍कामाला राहणार असून, बुधवारी सकाळी सात वाजता चिंचवड गावाकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी या वेळी दिली.