Tue, Apr 23, 2019 00:28होमपेज › Pune › कोरेगाव-भीमा येथे आठवडे बाजार

कोरेगाव-भीमा येथे आठवडे बाजार

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:16AM

बुकमार्क करा
कोरेगाव भीमा : वार्ताहर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीनंतर कोरेगाव-भीमा (ता.  शिरूर) येथील गुरुवार,  दि.  4 रोजीचा आठवडे बाजार रद्द करण्यात आला होता. गुरुवार दि.  11 रोजी येथील आठवडे बाजार पूर्ववत भरला; मात्र या आठवड्यात या बाजारात व्यापारी आणि विक्रेते काही प्रमाणात कमी आले. दंगलीनंतर मंगळवार,  दि.  2 रोजीपासून कोरेगाव भीमा येथे गावामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती.

दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार,  दि.  4 रोजी भरणार्‍या आठवडे बाजारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनाच्या वतीने एक आठवड्यापुरता गुरुवारी भरणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आला होता. परंतु परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने गुरुवारी (दि. 11) सकाळपासून शेतकरी आणि भाजीपाला उत्पादकांनी आपल्या शेतमालासह बाजारात गर्दी केली होती. त्यातच मकरसंक्रांतीला लागणार्‍या विविध प्रकारच्या भाज्यांना बाजारात जास्त मागणी होती;  परंतु बाजारात येणारे व्यापारी कमी आल्याने बाजारभाव जास्त होते. 

संक्रांतीच्या वाण खरेदीसाठी महिलांची गर्दी

या आठवडे बाजाराला मकरसंक्रांतीला लागणारा वाण, तिळगूळ आदी खरेदीसाठी कोरेगाव भीमाबरोबरच पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव,  पिंपरी सांडस, वढू, वाजेवाडी, डिंग्रजवाडी, लोणीकंद आदी गावांतील नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार मैदान गर्दीने फुलून गेले होते.  महिलांचीही या बाजारात गर्दी झाली होती. मकरसंक्रांतीचे वाण आणि साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू होती.