Sun, Mar 24, 2019 04:47होमपेज › Pune › तरुणाईने बनवली लग्‍नाची आचारसंहिता

तरुणाईने बनवली लग्‍नाची आचारसंहिता

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:16AMलोणी काळभोर : प्रतिनिधी

पूर्व हवेलीत लग्न कार्यामध्ये होणार्‍या दिरंगाईवर चर्चा करून एक आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी रविवारी परिसरातील तरुणांनी चर्चा केली. यात नेतेमंडळींच्या भाषणांमुळे समारंभात होणारी दिरंगाई, त्यामुळे पाहुण्यांच्या वेळेचा होणारा अपव्यय, महामार्गावर पार्क होणार्‍या दुचाकी व चारचाकीमुळे होणारी वाहतूक कोंडीवर चर्चा करण्यात आली.

लग्न सोहळ्याची आचारसंहिता
> साखरपुडा घरीच करावा, त्यात लग्न केल्यास उत्तम
> लग्नपत्रिकेत राजकीय नेत्यांपेक्षा घरातील मंडळींची नावे असावीत, आमंत्रणे सोशल मीडियावरच द्यावीत
> लग्न सोहळ्यात कुटुंबातील प्रमुखांनी प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत करावे
> पुरोहितांनी वेळेत लग्न उरकावे
> जावई, मामा सन्मान, नेतेमंडळींचा सत्कार, आशीर्वाद व स्वागत टाळावे
> लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाताना आपल्या वाहनांमुळे इतरांना त्रास किंवा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
 

लग्न सोहळ्यामध्ये येताना राजकारण्यांनी वेळेचे बंधन व आलेल्या पाहुण्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केले. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, माजी बांधकाम आरोग्य सभापती मंगलदास बांदल, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच प्रशांत काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर आदी उपस्थित होते.