Thu, Apr 25, 2019 22:11होमपेज › Pune › आम्ही असू डावखुरे...

आम्ही असू डावखुरे...

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:43PMपिंपरी : वर्षा कांबळे 

आजही ‘डावे’ म्हणजे कमी दर्जाचे आणि ’उजवे’ तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते.कुठलेही चांगले काम नेहमी उजव्या हातानेच करायचे असा एक नियम आहे. डावा हात हा अशुभ मानला जातो. मात्र, आता हा विचार बदलला आहे. डावखुरे असणे म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असणे. तसेच विशेषत: डावखुर्‍या व्यक्ती या डाव्या हाताने ज्या किमया करुन दाखवितात, त्या इतर व्यक्तींच्या उजव्या हाताने केलेल्या कामापेक्षा सरस असतात. त्यामुळे आम्ही डावखुरे असलो तरी आम्ही कशातही कमी नाही उलट सरस आहोत, असे काही अनुभव डावखुरे असलेल्या तरुणांनी आज (दि.13) जागतिक डावखुरे दिनाच्या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत. 

डावखुरेपणाचा फायदा 

मी मिलिटरी शाळेत शिकत होतो. त्यावेळी शिक्षका फार कडक होत्या. जसे डाव्या हाताने जेवायचे नाही.  प्रसाद घेताना डावा हात पुढे यायचा त्यामुळे ओरडा खायचो. पण स्पोर्टसमध्ये मला डावखुरेपणाचा फार फायदा झाला. जसे क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये समोरच्या खेळाडूला तुमच्या मुव्हमेंट लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. मी डाव्या हाताने ज्या गोष्टी करतो त्या उजव्या हाताने खेळणार्‍यापेक्षा फास्ट असतात. 

- समरजित शिंदे