Sun, Mar 24, 2019 08:49होमपेज › Pune › जलपर्णीचा होईल अनेक आजारांवर इलाज 

जलपर्णीचा होईल अनेक आजारांवर इलाज 

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:28AMपिंपरी :  वर्षा कांबळे

आजकाल नदीतील पाण्यापेक्षा त्यावर जलपर्णी आच्छादलेली सर्वत्र दिसून येते. ज्या नदीतील पाणी दूषित तेथे जलपर्णीही मोठ्या प्रमाणात दिसते. जलपर्णी म्हणजे नदीतील पाण्याला झालेला रोग आहे, असे म्हटले जाते. पण हीच जलपर्णीतून अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाऊ शकते, याबाबत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील. प्रा. स्वप्ना पाटील यांचे संशोधन सुरू आहे. 

रसायने वापरून जलपर्णी काढली तर त्याचा जलचरांना धोका उद्भवतो. म्हणून मनुष्यबळाचा वापर करून किंवा यांत्रिक पद्धतीने नदीतील जलपर्णी काढली जाते. त्यानंतर जलपर्णी काढून त्या किनार्‍यावरच टाकल्या जातात आणि त्या पुन्हा उगवतात. याकरिता जलपर्णी काढून त्यांचा पुनर्वापर करायचा. यावर संशोधन सुरू आहे. त्यांनी ‘बायोप्रॉस्पेक्टिंग ऑफ पिस्टिया’ असे नाव संशोधन प्रकल्पास दिले आहे. या प्रकल्पास पुणे विद्यापीठामध्ये आयोजित अभिकल्प 2018 या इनोवेटिव्ह प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे.  नदीपात्रातून काढलेली जलपर्णी सरकी पेंडसाठी गाडीतून कारखान्यात नेले आणि तर त्याचा जास्त वापर होईल. फक्त त्यातील विषारी द्रव्यही तपासून मग ती वापरली जाऊ शकतात. त्यासाठी काम सुरू आहे. सरकी पेंडमध्ये जलपर्णीचा वापर केल्यास दुग्ध उत्पादनासाठी पूरक आहार मिळेल.

फार्मास्यूटिकल कंपन्यात यावर संशोधन सुरू आहे. काही आयुर्वेदिक कंपन्या या मधुमेह आणि अतिसार यांवर औषध म्हणून वापर करत आहेत. त्यापुढे जाऊन प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील. प्रा. स्वप्ना पाटील असे संशोधन करत आहोत की त्याचा कॅन्सरसारख्या रोगावर कसा वापर करायचा, जलपर्णीमध्ये इतर वनस्पतींपेक्षा जास्त विटामिन्स आहेत. त्यामुळे टॉनिकच्या गोळ्यांमध्ये याचा वापर होऊ शकतो. कॅन्सरवर त्याचा उपयोग होईल यावर सध्या संशोधन सुरू आहे. यामध्ये काही विषारी द्रव्ये आहेत. त्यामुळे तो अ‍ॅन्टीफंगल आहे. त्याचा बुरशी नष्ट करण्यासाठी उपयोग होतो. शहरातील काही नद्या या वनस्पतीने भरल्या आहेत. जलपर्णीची इकॉर्निया म्हणजे प्राथमिक अवस्था आहे. अगदी गटारीसारखे पाणी झाले की त्याचा पिस्टिया होतो. तेव्हा तो घातक असतो.