होमपेज › Pune › पाणी बिलाचा फुगा फुटला; संकट टळले

पाणी बिलाचा फुगा फुटला; संकट टळले

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:50AMपुणे : प्रतिनिधी

पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविलेल्या पाणीपट्टीचा अव्वाच्या सव्वा थकबाकीच्या बिलाचा फुगा अखेर फुटला आहे.  पाटबंधारे विभागाकडून ही थकबाकी 354 कोटी इतकी असल्याचा दावा करण्यात येत असताना प्रत्यक्षात केवळ 40 कोटींची थकबाकी असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोरच निष्पन्न झाले. त्यामुळे आता थकबाकीवरून महापालिका आणि पाटबंधारे यांच्यातील वाद अखेर संपुष्टात आला आहे.

शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून घेतल्या जाणार्‍या पाण्याची 354 कोटी 76 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला सांगण्यात येत होते. त्यासाठी पालिकेला वारंवार पत्र पाठवून या थकबाकीची मागणी केली जात होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी नसल्याचे महापालिकेकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत होते. त्यावरून पाटबंधारे आणि पालिका यांच्यात वाद सुरू होता. त्यातच थकबाकी न भरल्यास महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारा विभागाने दिला होता. त्यामुळे थकबाकीचा वाद ऐरणीवर आला होता. यासंदर्भात पालकमंत्री बापट यांनी थकबाकीसंदर्भात महापालिका आणि पाटबंधारे विभागाची एकत्रित बैठक रविवारी महापौर बंगल्यावर घेतली.

पालकमंत्री नाराज

महापालिकेला दररोज साडेतेराशे एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी कालवा समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे. मात्र, महापालिका साडेसोळाशेवर पाणी उचलत असल्याचे आढळून आले आहे. त्यावर अशा पद्धतीने अतिरिक्त पाणी वापराबाबत पालकमंत्र्यांनी याबैठकीत नाराजी व्यक्त केली.

 

Tags : Pune, Pune News,Pune Municipal Corporation, Water bil, Outstanding,