Sat, Jul 20, 2019 13:18होमपेज › Pune › पुणेकरांकडून वारकर्‍यांची मनोभावे सेवा

पुणेकरांकडून वारकर्‍यांची मनोभावे सेवा

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 12:09AMपुणे : प्रतिनिधी

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती. शनिवारी रात्री दोन्ही पालख्या शहरात दाखल झाल्या होत्या. या दोन दिवसात शहरातील विविध संस्था, संघटनांनी वारकर्‍यांची सेवा केली.

श्री सत्तावीस जैन सिटी ग्रृपतर्फे वारकर्‍यांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तर दुपारी आरोग्य शिबीर नेत्र तपासणी, शिबीर आणि औषध वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. संत सावतामाळी भजनी मंडळातर्फे वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते विजय घोड, दत्तात्रय घोड, प्रमिला घोड, गीता घोड, निलेश घोड, नितेश घोड, प्रतीक घोड, प्रवण घोड उपस्थित होते. श्रीपाल चेंम्बरच्या वतीने वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. अ‍ॅड. बी. ए. आलूर आणि लाहोटी यांच्यासह चेंम्बरचे सदस्य उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकर्त्या डॉ. अपर्णा गोसावी यांच्यातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. आप्पासाहेब कुलकर्णी शाळेतील वारकर्‍यांची तपासणी करण्यात आली. सर्व वारकर्‍यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

वुई फॉर ऑल ट्रस्ट व करण फाऊंडेशनच्या वतीने वारकर्‍यांना सरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन चेतन शर्मा, करण राठोड, अलोक नेरळ, इमराम शेख, अरबाज शेख, व्यंकटेश राठोड, स्वीटी शर्मा, हेमांगी काकडे यांनी केले होते. मनसेच्या भवानी पेठ विभागातर्फे वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबिर घेतले होते. ताराचंद रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने वारकर्‍यांची तपासणी केली.

अतुल जाधव, बबलू सय्यद, मोहसीन शेख, प्रकाश क्षीरसागर, धनंजय वाघमारे, जीवन गणपूर, आनंद चौधरी शिबिरासाठी परिश्रम घेतले. नीता नायकू प्रतिष्ठानतर्फे वारकर्‍यांसाठी मोफत दाढी, कटिंग, चप्पल, बूट पॉलिश, बॅगची दुरुस्ती अशा सेवा उपलब्ध केल्या होत्या. यासाठी रेणुका नवावरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन दिनेश नायकू यांनी केले होते. महाराष्ट्र टेम्पो व भावानी पेठ व्यापारी संघटनेतर्फे वारकर्‍यांना रेनकोट, गुडदाणी, स्टीलचे ताट आणि ग्लासचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे टेम्पो संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पवार, चंद्रकांत मोरे, सतीश जांभुळकर, रवींद्र मोगली, भजनदास शिंदे, मोहन जगताप, बाळू तुपसौंदर आणि बबन जगताप उपस्थित होेते.

सह्याद्री सेवा संघातर्फे नारळपाणी, अल्पोपहार आणि अन्नदान करण्यात आले. तर वारकर्‍यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष अक्षय कोठावळे, कार्याध्यक्ष निलेश जाधव, विजय कोठवळे, मनोज कोठावळे, संजय उभे, उमेश पाटील उपस्थित होते. मनजितसिंग विरदी फाऊंडेशनतर्फे वारकर्‍यांना कॅम्पातील खान्या मारुती चौकात मनजितसिंग विरदी यांच्या हस्ते फळे आणि पाण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. हरभजनसिंग विरदी, मनमित विरदी, रिद्दीमा विरदी, सहेर विरदी, मेजरसिंग कलेर, सायली राठोड, सुरज अगरवाल यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे व्यापारी जैन बंधू समाजाच्यावतीने सात हजार वारकरी बांधवाना नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, माजी नगरसेवक विष्णू हरिहर, नरेंद्र जैन, लालचंद जैन, हितेश खिवंसरा, ताराचंद ओसवाल व जितेंद्र शर्मा आदींनी परिश्रम घेतले. शशिकांत म्हेत्रे मित्र परिवाराच्यावतीने भवानी पेठेत अन्नदान केले. कार्यक्रमाचे आयोजन शैलेश म्हेत्रे, मोहनीश म्हेत्रे, सुरज म्हेत्रे यांनी केले होते. रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने वारकरी बांधवाना कापडी पिशवी, नॅपकीन, अगरबत्ती व बिस्किटे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमावेळी रोटरी क्लब फोर्च्युनचे अध्यक्ष डॉ. दीपक तोष्णीवाल, सेक्रेटरी भरत गुरव उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप, मोबाईल एटीएम सेंटर, अन्नदान, वारकरी सत्कार, भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा समावेश होता. या प्रसंगी आयोजक सचिन चिंचवडे(कसबा संघटक), परभणीचे खासदार जाधव, माजी शहर प्रमुख रामभाऊ पारीख उपस्थित होते.