Sat, Mar 23, 2019 02:08होमपेज › Pune › हजारो ग्रंथांचे दान करणारा वारकरी संप्रदायातील अवलिया

हजारो ग्रंथांचे दान करणारा वारकरी संप्रदायातील अवलिया

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:07PMपिंपळेगुरव : प्रज्ञा दिवेकर

घरातून वारकरी सांप्रदायिकतेच बाळकडू असल्यामुळे लहान पणापासून त्यांना गोर-गरिबाला मदत करण्याची आवड...घरच्या बेताच्या परिस्थीतीतून शिक्षण घेऊन समाजाच ऋण फेडायचे मनात भावना कायम रुजवल्या...आणि पुढे जाऊन उद्योग व्यवसायात यश मिळाल्यावर हजारो ग्रंथाच विनामूल्य दान करणारा पंच क्रोशीत नावारूपाला आलेला नवी  सांगवीत तील अवलिया आजीनाथ उर्फ नाना शितोळे.

आजकाल कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या युगात संस्कार लहान मुला बरोबर तरुण पिढीला आवश्यक बाब झाली आहे. ही गरज ओळखून नाना शितोळे यांनी गेल्या नऊ वर्षांपासून वारकरी व अन्य भाविकांना हवी असणारी ज्ञानेश्‍वरी पासून ते तुकोबांच्या गाथेपर्यंत विविध हजारो धार्मिक ग्रंथ आणि संस्कारक्षम पुस्तके विनामूल्य महाराष्ट्रात वाटप करत आहेत.विविध ग्रंथामध्ये ज्ञानेश्‍वरी, महाभारत, भगवतगिता, तुकाराम गाथा, श्री अनुभवामृत, दासबोध, एकनाथ भागवत अशा विविध मोठमोठाल्या ग्रंथांचे त्यांच्याकडून विनामूल्य दान केलं जात आहे. महाराष्ट्रात जवळपास जिथे जिथे पारायण सप्ताह होतात तिथे ग्रंथ नाना शितोळे विनामूल्य पुरवतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी आषाढी वारी करणार्‍या वारकर्‍यांना हरिपाठ, वारकरी सांप्रदायिक भजनी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. आळंदीतील जोग महाराज वारकरी संस्थेत त्यांच्यामार्फत ग्रंथ विद्यार्थाना अध्ययनासाठी दिले जातात. 

महाराष्ट्रात जवळपास चौदा हजार बालचमुसाठी बालसंस्कार शिबीर घेतली जातात. मुलांसाठी ‘संत ज्ञानोबा-तुकाराम बहूउद्देशिय सेवा समिती; अकोला बाल संस्कार’ पुस्तीका बाल शिबिरात दिली जाते.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यात इतर भाषिकांना महाराष्ट्राबाहेर ज्ञानेश्‍वरी कळावी या हेतूने नाना शितोळे यांनी हिंदी ज्ञानेश्‍वरीच्या दोन हजार प्रति वाटप केल्या. या व्यातिरिक्त दुष्काळी भागाला टँकर सुविधा पुरवणं, गरजवंताना लग्नात अन्नदानाचा खर्च करणे, नगर जिह्यातील वेलद गावातील मनोरुग्ण महिला संस्थेला मदत करणे, गोशाळेला मदत करणे आदी गरजूंना नाना मदतीचा हात देतात. कर्मवीर भाऊराव शाळेतील गरीब मुलांना वह्या वाटप केल्या जातात. वह्याच्या पृष्ठ भागावर शिष्टाचार, थोर मोठाची चरित्रे, संस्कारक्षम विचार छापलेली आहेत. 

महाराष्ट्रातील गरजवंत विद्यार्थाना नानांच्याकडून वह्या वाटप केल्या जातात. नाना शितोळे ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, कलीयुगात संस्कार महत्वाचा घटक आहे. सध्या सर्व स्तरातील वर्गाला याची गरज आहे. त्यामुळे वाचनाची गोडी देखील निर्माण व्हावी या हेतूनं हा विनामूल्य ग्रंथ दान करण्याचा निर्णय घेतला. विविध क्षेत्रातील लोकांनी आपल्या मातीशी कायम नाळ जोडावी आणि गरजू ना मदत करावी.