Thu, Apr 25, 2019 12:16होमपेज › Pune › एनडीए रस्त्याच्या कामाला मुहूर्त

एनडीए रस्त्याच्या कामाला मुहूर्त

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:23AM

बुकमार्क करा

वारजे : वार्ताहर 

शिवणे ते कोंढवे धावडे या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रयत्नातुन 9 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. रस्त्याच्या होणार्‍या त्रासामुळे हा रस्ता केव्हा होणार असा प्रश्‍न एनडीए परिसरातील नागरिकांना पडत होता. मात्र आता या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.

शिंदे पुल ते कोंडवे धावडे (दहा नं. गेट) या मुख्य् एनडीए रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 2016 मध्ये जागा ताब्यात घेत कारवाई करत अतीक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेला एनडीए रस्त्यालगतच्या परिसरातील नागरिकांसमोर खराब रस्ता हीच खुप मोठी समस्या होती. या खराब रस्त्यामुळे परीसरातील रहिवाशांना अनेक छोट्या मोठ्या अपघातांनाही सामोरे जावे लागले आहे. तसेच रस्त्याची चाळण झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रासही सहन करावा लागला आहे.

मात्र जनतेला डोळ्यांनी दिसणारे काम पूर्णत्वास जाणार कधी? असा सवाल अनेक दिवसांपासुन उपस्थित होत होता मात्र आता रस्त्याची प्रतिक्षा संपली असून रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात झाल्याने  नागरिकांना या रस्त्यामुळे होणार्‍या त्रासापासून लवकरच सुटका होणार आहे. तापकीर यांच्या प्रयत्नातुन या रस्त्याला सर्वात जास्त निधी मिळाला आहे. ह्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे लगतच्या गावांतील नागरिकांचे जीवनमान बदलणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन दांगट यांनी सांगितले.